अहमदनगर

भंडारदरा पाणलोटात पावसाच्या सरी; धरणात ‘इतक्या’ दलघफू पाण्याची आवक

अहमदनगर- जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात चार दिवसांपासून पाऊस सुरू असून धरणात नव्याने पाण्याची आवक वाढू लागली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 77 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 2962 दलघफू पाणीसाठा झाला होता. रात्री उशीरा तो 3000 दलघफूवर पोहचला होता.

 

पाऊस होत असल्याने या भागातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शेती कामांनी वेग घेतला आहे. भाताची पेरणी केली तेथे रोपे चांगली उतरू गलागली आहेत. कोकण आणि मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास भंडारदरा, मुळा पाणलोटातही पुन्हा मान्सून जोरदार बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

पाणलोटात आठ दिवसांपासून पाऊस टिकून आहे. कळसूबाई शिखर, कोकणकडा तसेच भंडारदरा धरण परिसर धुक्याने लेपाटून गेला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून या परिसरातील सौंदर्य खुलू लागले आहे. या हंगामात धरणात नव्याने 657 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. गत 24 तासांत पडलेला पाऊस असा-भंडारदरात 15, घाटघर 38 पांजरे 25, रतनवाडी 30 तर वाकी 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी धरणातही धिम्या गतीने पाण्याची वाढ होत आहे या धरणातील पाणीसाठा 53 टक्क्यांनजीक आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button