अहमदनगर

दारण, गंगापूरच्या पाणलोटात पावसाच्या सरी

बुधवारी आणि गुरुवारी नांदूरमधमेश्‍वर बंधारा, नाशिक भागात जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी सकाळी 6 वाजता नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातुन गोदावरीत 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे गोदावरीत पाणी खळखळत वाहत आहे. काल दिवसभर दारणा तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोटात हालक्या सरी, बुरबूर या स्वरुपाचा पाऊस पडत होता.

काल सकाळी 6 वाजे पर्यंत मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 90 मिमी, भावलीला 103 मिमी तर गंगापूरला 32 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान काल (शुक्रवारी) घाटमाथ्यावर पावसाच्या हालक्या सरी बरसत होत्या. दिवसभरात गंगापूर ला 12 ते 13 मिमी पाऊस पडला. तर दारणा परिसरात बुरबूर स्वरुपाचा पाऊस सुरु होता.

मात्र सकाळी 6 वाजता नोंदलेल्या मागील 24 तासात दारणा, भावली भागात मुसळधार पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 90 मिमी (1 जून पासुन एकूण 121 मिमी) पावसाची नोंद झाली.

भावलीला 24 तासात 103 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जून पासुन या धरणाच्या परिसरात 299 मिमी पावसाची नोंद झाली. भाम प्रकल्पाच्या भिंतीजवळ 14 मिमी (49 मिमी). गंगापूर धरणाच्या भितीजवळ काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 32 मिमी (102 मिमी) याधरणाच्या पाणलोटातील त्र्यंबकला 28 मिमी (66 मिमी), अंबोली 26 मिमी (97 मिमी), नाशिक ला 20 मिमी (74 मिमी), कश्यपीला 26 मिमी(43 मिमी), गौतमी गोदावरी 41 मिमी (67 मिमी).

अन्य धरणांच्या भिंतीजवळ नोंदलेला पाऊस असा कडवा 57 मिमी, आळंदी 15 मिमी, नांदूरमधमेश्‍वर 25 मिमी, वाकी 73 मिमी, पालखेड 24 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्याला सध्या बिगर सिंचनाचे आवर्तन सुरु आहे. या साठी दारणातुन 700 तर मुकणेतुन 500 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. 20 जून ला हे पाणी कालव्यांना सोडण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button