अहमदनगर

‘रंग बरसे’ अंगलट; दोन नगरसेवकांसह 20 जणांविरूध्द गुन्हे

रंगपंचमी निमित्त विना परवाना ‘रंग बरसे’ कार्यक्रमाचे आयोजन करून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन नगरसेवकांसह सुमारे 20 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेवक स्वप्नील शिंदे, दिनेश फिरके, अभिमन्यू जाधव (दोघे रा. तोफखाना), सुरज शिंदे, निखील येमुल, महेश शंकर धोत्रे (रा. वैदवाडी), अनिल ढवण (रा. ढवणवस्ती, तपोवन रोड), सनी ताठे, रोहीत साठे, सार्थक गंधे, जीवन शेळके व इतर आठ ते 10 यांच्याविरूध्द हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार अजय गव्हाणे यांनी तीन स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत.

मंगळवारी रंगपंचमीनिमित्त जुना वडगाव गुप्त रोडवरील बंधन लॉन येथे फिरके व जाधव यांनी ‘रंग बरसे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरसेवक दुल्लम, सुरज शिंदे, येमुल यांनी नगर-मनमाड रोडवरील मेघनंद लॉन येथे ‘रंग बरसे’ या कार्यक्रमाचे विना परवाना आयोजन केले होते. तर नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह इतरांनी नगर-मनमाड रोडवरील वृंदावन लॉन येथे होळी फेस्टीवलचे आयोजन केले होते.

वरील तिन्ही ठिकाणी कार्यक्रम आयोजित करताना परवानगी घेतली नव्हती. तसेच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने कार्यक्रमांचे अयोजन केले. पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्याच्या सूचना देऊन देखील कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button