ताज्या बातम्या

Ratan Tata PA Salary : रतन टाटा यांचे PA शंतनू नायडू यांना महिन्याला किती पगार मिळतो? जाणून घ्या त्यांची संपत्ती

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे पीए शंतनू नायडू यांच्या पगाराबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. तसेच अनेकांना रतन टाटा यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.

Ratan Tata PA Salary : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. रतन टाटा यांचे वय ८५ वर्षे आहे. तरीही ते स्वतःची कामे स्वतःच करतात. टाटा ग्रुपला रतन टाटा यांनी मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

रतन टाटा यांना एक सावत्र भाव देखील आहे. त्यांचे नाव जिमी नवल टाटा आहे. त्यांचे देखील ८५ वर्षे आहे. तुम्ही गेल्या काही काळापासून रतन टाटा यांच्यासोबत एक मुलगा पाहिला असेल. तसेच या मुलाबद्दल देखील तुम्ही अनेकदा ऐकले असेल.

रतन टाटा यांच्या सोबत असणाऱ्या या मुलाचे नाव शंतनू नायडू आहे. शंतनू नायडू हा रतन टाटा यांचा पीए आहे. मध्यंतरी रतन टाटा यांचा पीए शंतनू नायडू याची बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

तसेच रतन टाटा यांनी शंतनू नायडू याच्यासोबत त्यांचा ८५ वा वाढदिवस साजरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शंतनू हा सतत रतन टाटा यांच्यासोबत असतो आणि रतन टाटा देखील त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणूक देतात.

शंतनू नायडू यांचे वय ३० वर्षे आहे. पुणेस्थित व्यापारी, अभियंता, सोशल मीडिया प्रभावक, लेखक आणि उद्योजक म्हणून शंतनू नायडू यांची ओळख आहे. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

शंतनू नायडू यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ट्रस्टच्या चेअरमन ऑफिसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम सुरु केले. शंतनू नायडू यांच्या घरातील ५वी पिढी टाटा समूहासाठी काम करत आहे.

शंतनू नायडू यांना प्राण्यांची खूप आवड आहे. शंतनू नायडू हे चर्चेत आले त्याचे कारण म्हणजे त्यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना रस्ते अपघातांपासून वाचवण्यासाठी गळ्यात चमकणारी पट्टी बांधण्याचे काम सुरु केले होते.

शंतनू नायडू यांचे भटक्या कुत्र्यांसाठी काम पाहता रतन टाटा हे चांगलेच प्रभावित झाले होते. रतन टाटा यांनी शंतनू नायडू यांना थेट त्यांचे पीए बनण्याची ऑफर दिली होती. तेव्हापासून शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे पीए आहेत.

शंतनूला लाखोंचा पगार मिळतो

टाटा ट्रस्टमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या शंतनू नायडू यांना दरमहा लाखो रुपये पगार दिला जातो. सध्या शंतनू नायडू यांची संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. शंतनू नायडू यांना दरमहा सुमारे 7 लाख रुपये पगार मिळतो. सध्या त्यांची एकूण संपत्ती 6 कोटींच्या जवळपास आहे.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देखील शंतनू नायडू यांच्या स्टार्टअप गुडफेलोजमध्ये गुंतवणूक केली आहे. शंतनू नायडू यांचा स्टार्टअप गुडफेलोज ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button