अहमदनगर

आयुष्याच्या शेवटी रतन टाटा ‘या’ क्षेत्रासाठी करणार काम

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. लोकांचे आवडते उद्योगपती म्हणूनही त्यांची ओळख आहे. नुकत्याच एका भाषणादरम्यान रतन टाटा भावुक झाल्याचे दिसून आले तसेच त्यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे.

उद्योगपती रतन टाटा यांनी उर्वरित आयुष्य आरोग्यसेवेसाठी व्यतीत करण्याची घोषणा केली. ते आसाममधील डिब्रूगड येथे कर्करोग उपचार केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या उपचार केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

रतन टाटा व्यासपीठावरुन संबोधित करताना म्हणाले की, मला हिंदीमध्ये भाषण देण्यास येत नाही त्यामुळे मी इंग्रजीमध्ये बोलेन, परंतु मी जे काही बोलेन ते ह्रदयापासून बोलेन, माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे मी आरोग्यासाठी समर्पित करत आहे.

कॅन्सर रुग्णालयांच्या बाबतीत आसामला देशातील असे राज्य बनवा ज्याला सगळ्या ज्याची सर्व राज्यात ओळख असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सुद्धा टाटांच्या भूमिकेचे स्वागत केलं आहे.

पीएम मोदींनी आसाममधील डिब्रूगड जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन केले. हे कर्करोग उपचार केंद्र ‘आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन’, ‘टाटा ट्रस्ट’ आणि आसाम सरकारच्या संयुक्त विद्यमाने बांधले आहे.आसाममध्ये कॅन्सरच्या उपचाराच्या १७ केंद्रांचं नेटवर्क तयार करण्यात येत आहे. या रुग्णालयांमधून केवळ आसामच नव्हे तर देशभरातील सर्वच रुग्णांना सुलभ उपचार मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button