बाजारभाव

वाचा: गावरान आणि लाल कांद्याचे ताजे बाजार भाव

अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात रविवार 1 जानेवारी रोजी झालेल्या कांदा लिलावात एकूण 8 हजार 267 कांदा गोण्याची आवक झाली. गावरान कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार तर लाल कांद्याला जास्तीत जास्त 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

गावरान कांद्याची आवक 2 हजार 60 गोण्या झाली असून एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 1000 रुपयेे भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 900 रुपयेे भाव मिळाला.

 

अपवादात्मक 15 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये, 6 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये, 47 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये तर 34 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रुपये भाव मिळाला.

 

त्याचप्रमाणे लाल कांद्याची एकूण आवक 6 हजार 207 कांदा गोणी झाली असून एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 705 रुपये ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1200 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 400 रुपये भाव मिळाला.

 

अपवादात्मक 43 कांदा गोण्यांना कांदा गोण्यांना 2 हजार 600 रुपये, 74 कांदा गोण्यांना 2 हजार 500 रुपये, 100 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रुपये तर 41 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहू 2 हजार 600 रुपये ते 2 हजार 976 रुपये, तूर 6 हजार 200 रुपये ते 6 हजार 400 रुपये तर सोयाबीन 5 हजार 1 रुपये ते 5 हजार 375 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button