वाचा: लाल आणि गावरान कांद्याचे ताजे बाजार भाव

अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात शनिवार दिनांक 07 जानेवारी रोजी झालेल्या कांदा लिलावात एकूण 13 हजार 591 कांदा गोण्याची आवक झाली. गावराण कांद्याची आवक 835 गोणी झाली आहे.
एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 905 रुपये ते 1 हजार 200 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 900 रूपये भावाने गेला. तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 10 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपयेे भाव मिळाला.
त्याचप्रमाणे लाल कांद्याची एकूण आवक 12 हजार 756 कांदा गोणी झाली असुन एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 605 रुपये ते 2 हजार रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 600 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 200 रुपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 07 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहू 2 हजार 500 रुपये ते 3 हजार 299 रुपये, तूर 6 हजार 302 रुपये ते 6 हजार 900 रुपये तर सोयाबीन 5 हजार 400 रुपयेया प्रमाणे भाव मिळाले.