बाजारभाव

वाचा: लाल कांद्याला किती मिळतोय भाव

अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात गुरूवार दिनांक 05 जानेवारी रोजी झालेल्या कांदा लिलावात एकूण 14 हजार 508 कांदा गोण्याची आवक झाली.

 

गावरान कांद्याची आवक 1 हजार 501 झाली असून एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपयेे तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 1 हजार रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 12 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची एकूण आवक 13 हजार 7 कांदा गोणी झाली असुन एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 705 रुपये ते 2 हजार 200 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 200 रुपये भावाने विकला गेला.

 

 

तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 58 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button