Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरपोलिसांपाठोपाठ महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणत्या तालुक्यातील अधिकारी बदलले वाचा सविस्तर...!

पोलिसांपाठोपाठ महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणत्या तालुक्यातील अधिकारी बदलले वाचा सविस्तर…!

Ahmednagar News : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत व जिल्ह्याबाहेर देखील बदल्या झाला आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनात असलेल्याउपजिल्हाधिकारी तहसीलदारांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली आदेशानुसार जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या देखील बदल्या झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपांडे यांची धुळे जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली.

त्याजागी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे डॉ.रामदास जगताप यांची नियुक्ती केली आहे. भूसंपादन अधिकारी पल्लवी निर्मळ यांची नाशिकला बदली झाली तर भूसंपादन अधिकारी जयश्री आव्हाड यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपविभागीय अधिकारीपदी बदली केली आहे.

भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी मनोज देशमुख व चंद्रशेखर देशमुख यांची बदली आहे. यासोबतच तहसीलदारांच्या ही बदल्या झाल्या आहेत. यात जामखेड,अकोला, राहाता,पाथर्डी, श्रीगोंदा व राहुरी येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

योगेश चंद्रे यांची थेट नंदूरबारला बदली झाली आहे. तर गणेश माळी यांची जामखेडच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भूसुधार तहसीलदारपदी सुनिता जऱ्हाड योगेश शिंदे यांची बदली झाली आहे. संजय गांधी योजना तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या जागी कैलास पवार,

सामान्य प्रशासन तहसीलदार शिल्पा पाटील यांचा जागी शरद घोरपडे, अकोले तहसीलदार सतीश थेटे यांचे जागी सिद्धार्थकुमार मोरे, व्यवस्थापक, शेती महामंडळ, राहाता गणेश माळी यांचे जागी दीपक धिवरे, राहुरीच्या तहसीलदार पदी नामदेव पाटील, शिल्पा पाटील यांची सोलापूरला, माधुरी आंधळे ,

सुनिता जऱ्हाड , अर्चना भाकड-पागिरे, पाथर्डीचे शाम वाडकर यांची तर अकोलेचे सतीश थोटे यांची पुण्याला तर नाशिकच्या डॉ.क्षीतिजा वाघमारे यांची नाशिकवरून थेट श्रीगोंदा तहसीलदारपदी बदली झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments