बाजारभाव

वाचा: लाल व उन्हाळी कांद्याचा बाजार भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारच्या लिलावासाठी कांद्याची एकूण 67 हजार 720 गोण्या आवक झाली. गावराण कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर लाल कांद्याला जास्तीत जास्त 4 हजारापर्यंत भाव मिळाला.

 

 

उन्हाळ गावरान कांद्याच्या एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपये भाव मिंळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1500 ते 1600 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1300 ते 1400 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1050 रुपये, गोल्टी कांद्याला 600 ते 700 रुपये, जोड कांद्याला 300 ते 500 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

नवीन लाल कांद्याच्या एक-दोन लॉटला 3500 ते 4000 रुपये भाव मिळाला. कलरपत्तीवाल्या मोठ्या कांद्याला 2800 ते 3200 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 2000 ते 2500 रुपये, गोल्टा कांद्याला 1600 ते 1700 रुपये तर गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button