अहमदनगर

आमदार नीलेश लंके यांनी केला रेकोर्ड ! हा मान मिळवणारे देशातील पहिले आमदार…

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या कार्याची “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन”मध्ये नोंद झाली असून या संस्थेच्या वतीने अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी हा पुरस्कार गुरुवारी मुंबईत प्रदान करण्यात आला आहे‌.

गेल्या दिड वर्षाच्या कार्यकाळात हजारो कोरोना बाधितांना जीवनादान देणारे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या कार्याची “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन”मध्ये नोंद झाली असून या संस्थेच्या वतीने अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी हा पुरस्कार गुरुवारी मुंबईत प्रदान करण्यात आला आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये समावेश झालेले नीलेश लंके देशातील पहिले आमदार ठरले आहेत. आयर्न मॅन किताब पटकावणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा समावेश वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये समावेश झाला आहे. ते हा सन्मान मिळणारे देशातील पहिले सरकारी अधिकारी आहेत.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये समावेश झाल्याने आमदार लंकेे यांनी काेराेनात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले. संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेता सोनू सूद यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडनमध्ये यापूर्वीच समावेश झाला.

काेराेनात दीड वर्षांपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार, मजूर,
तालुक्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांसाठी नगर-पुणे रस्त्यावर आमदार लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते. दोन महिने अहोरात्र सुरू असलेल्या या अन्नछत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला. अन्नछत्राबरोबरच गावाकडे पायी परतणाऱ्या मजुरांसाठी आश्रयाची सोय करण्यात आली होती. निर्बंध शिथील झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

गेल्या वर्षी जूनमध्ये पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात बाधितांची संख्या वाढली. बाधितांवर उपचार करण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील कर्जुले हर्या येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले. या उपचार केंद्रात ४ हजार ६६८ बाधितांनी काेरोनावर मात केली. दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू केले आहे. मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधितांबरोबरच परराज्यातील बाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले. आजपर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केली.

भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात आनंदी वातावरणात उपचार ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला. काेरोना बाधितांच्या सेवेसाठी आमदार लंके आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपचार केंद्रात मुक्काम ठोकून आहेत. शेवटचा करोनाबाधित रुग्ण बरा होईपर्यंत उपचार केंद्र सुरू ठेवण्याचा निर्धार आमदार लंके यांनी केला. आमदार लंके संसर्गाच्या काळात करीत असलेल्या कामाची देशात चर्चा झाली. उत्तरप्रदेश सरकारने आमदार लंके यांच्या कामाची दखल घेत कोविड उपचार केंद्रातील उपचारांची, व्यवस्थापनाची माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button