बाजारभाव

‘या’ बाजार समितीत लाल कांद्याला मिळतोय 4 हजारापर्यंत भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी लाल कांद्याला जास्तीत जास्त 4 हजारापर्यंत तर गावरान कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 65 हजार 90 गोण्या आवक झाली.

 

नवीन लाल कांद्याची 3 हजार 983 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 3400 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मोठा कलरपत्तीवाल्या कांद्याला 2800 ते 3200 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 2000 ते 2500 रुपये, गोल्टा कांद्याला 1600 ते 1700 रुपये, गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.

 

गावरान कांद्याची 61 हजार 107 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपये, मोठा कलरपत्ती कांद्याला 1500 ते 1600 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1300 ते 1400 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1050 रुपये, गोल्टी कांद्याला 600 ते 700 रुपये, जोड कांद्याला 300 ते 500 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 200 ते 400 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button