ताज्या बातम्या

Redmi A2 First Sale In India : Redmi A2 स्वस्त स्मार्टफोनची विक्री उद्यापासून होणार सुरु, मिळणार 5000mAh बॅटरीसह बरेच काही

तुम्हीही कमी बजेटमध्ये स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण उद्या कमी बजेटमधला Redmi A2 स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

Advertisement

Redmi A2 First Sale In India : तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण आता Redmi A2 या दमदार स्मार्टफोनची विक्री उद्यापासून सुरु होणार आहे. मागील महिन्यात भारतामध्ये Redmi A2 आणि Redmi A2+ भारतात लॉन्च करण्यात आला होता.

या स्मार्टफोनचे 2GB RAM + 32GB स्टोरेज व्हेरिएंट आधीपासूनच Amazon, Mi.com, Mi Home स्टोअर्स विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र आता कंपनीकडून 2GB RAM + 64GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन पहिल्यांदाच विक्रीसाठी ठेवला जाणार आहे.

Redmi A2 या स्मार्टफोनमध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा स्मार्टफोन चांगला पर्याय आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Advertisement

Redmi A2 ची भारतात 64GB किंमत

भारतात पहिल्यांदाच 20 जून रोजी म्हणजेच उद्या Redmi A2 चा 2GB + 64GB रॅम आणि स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोअर्सद्वारे खरेदीसाठी ठेवला जाणार आहे.

त्यामुळे तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. कारण या स्मार्टफोनमध्ये हँडसेट ब्लॅक, लाइट ग्रीन आणि लाइट ब्लू या तीन रंगांचा पर्याय देण्यात येत आहे. या Redmi A2 2GB+64GB स्मार्टफोनची भारतातील किंमत 6,799 रुपये असेल.

Advertisement

Redmi A2 64GB चे तपशील

MediaTek Helio G36 SoC प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात येत आहे. सध्या स्मार्टफोन 4GB रॅम पर्यंत उपलब्ध आहे. मात्र तुम्ही या स्मार्टफोनची रॅम 3GB पर्यंत वाढवू शकता.

Redmi A2 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Advertisement

Redmi A2 या स्मार्टफोनमध्ये 8MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 10W जलद चार्जिंगची सुविधा या फोनमध्ये देण्यात येत आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात येत आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button