अहमदनगर

Redmi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘या’ दिवशी होणार लॉन्च

मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी शाओमी लवकरच आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार आहे. कंपनी Redmi 10A ला लवकरच लाँच करणार आहे.

कंपनी या फोनला २० एप्रिलला भारतात लाँच करेल.  हा फोन रेडमी १० चे एडवांस व्हर्जन आहे. कंपनी Redmi 10A ला ‘देश का स्मार्टफोन’ नावाने सादर करत आहे.

या फोनला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सादर केले जाईल. या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. रेडमीच्या या हँडसेटला चीनमध्ये शॅकोड ब्लॅक, स्मोक ब्लू आणि मूनलाइट सिल्वर कलर व्हेरिएंटमध्ये लाँच केले होते.

कॅमेरा :
Redmi 10A मध्ये ड्यूल रियर एआय कॅमेरा सेटअप दिला जाईल.
यात एलईडी फ्लॅश लाइटसह १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.

किंमत :
फोनला ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज, ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास ८ हजार रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत जवळपास १० हजार रुपये असू शकते.

फीचर्स
Redmi 10A स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळेल.
फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिझाइनसह येतो.
यात ऑक्टा-कोर मीडिया टेक Helio G२५ SoC चा सपोर्ट मिळेल.
फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.
ही बॅटरी १० वॉट स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येईल.
फोनमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक देखील दिला जाईल.
फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येईल.
कमी किंमतीत येणारा हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button