अहमदनगर

रेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार 12 आरोपींविरुद्धची आरोप निश्‍चिती

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील 12 आरोपींविरुद्धची आरोप निश्‍चितीची प्रक्रिया 16 सप्टेंबरला होणार आहे. गणेशोत्सव बंदोबस्तामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठेसह अन्य आरोपींना मंगळवारी न्यायालयात आणता आले नसल्याने याबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले असून, त्यावरील निकाल प्रतीक्षेत आहे.

 

30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 8 च्या सुमारास नगर-पुणेमहामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात 12 आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.या सर्वांविरुद्धआरोप निश्‍चितीची प्रक्रिया मंगळवारी (6 सप्टेंबर) होणार होती. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी आणले नसल्याने आता 16 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अजयचाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ व नगरमधील महेश वसंतराव तनपुरे या पाचजणांनी मंगळवारी न्यायालयात हजेरी लावली.

 

या खूनप्रकरणातील सागर भिंगारदिवे याने जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर मागेच सुनावणीहोऊन या प्रकरणातील सरकारी वकील अ‍ॅड. यादवराव पाटील यांनी लेखीयुक्तिवादात या जामीनास विरोध केला आहे. त्यानंतर दुसरा आरोपी आदित्य चोळकेयानेही जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याच्याही या अर्जास सरकारी वकिल अ‍ॅड.पाटील यांनी लेखी विरोध केला आहे व या प्रकरणात त्यांना सहाय्य करणारेअ‍ॅड. सचिन पटेकर यांनी त्यानुसार युक्तिवाद करीत जामीनाला विरोध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button