रेखा जरे हत्याकांड; आरोपींबाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर- रेखा जरे हत्याकांडाच्या सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहिल्याने आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पाला यास एक हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.
हैदराबाद येथील रहिवाशी असलेल्या चार आरोपींनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. यावर गुरूवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रमेश गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली.
न्यायालयाने जनार्दन अंकुला चंद्राअप्पाला दंड केला असून उर्वरित तीन गैरहजर आरोपींना वॉरंट काढण्यात आले आहे.
आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पा, शेख इस्माईल, अब्दुल रहमान आणि राजशेखर चकाली (हैदराबाद) यांनी खटल्या मधून दोष मुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जाच्या सुनावणीस आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पा गैरहजर राहिला होता. त्यामुळे त्यांना वॉरंट काढण्यात आले होते.
जनार्दन अंकुला हा न्यायालयात हजर झाल्याने त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. त्याला एक हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. या पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई करण्याची सक्त सूचना करण्यात आली. या अर्जातील तिघे गैरहजर राहिल्याने त्यांना वॉरंट काढण्यात आले.
या अर्जावर पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे अर्ज निकाली काढल्यानंतर दोष निश्चितीसाठी तारीख जाहीर होणार आहे. मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सचिन पटेकर हे काम पाहत आहेत.