अहमदनगर

रिलायन्स आठ लाख नोकऱ्या देणार!

देशातील सर्वात मोठी रिटेल चेन रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत ८ लाख लोकांना नोकरी देईल. याशिवाय देशात १ कोटी नवीन किराणा दुकानदारांना मर्चंट पार्टनर केले जाईल,अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक(सीएमडी) मुकेश अंबानी यांनी ४४ व्या सर्वसाधारण सभेत केली.

रिलायन्स रिटेलने कोरोना महामारीतही गेल्या वर्षी ६५ हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. सध्या रिलायन्स रिटेलमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २ लाखांच्या जवळपास आहे.

पुढील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १० लाख होईल.रिलायन्स रिटेलने देशात जवळपास १५०० नवीन स्टोअर्स उघडली आहेत. आत संपूर्ण देशात रिलायन्स स्टोअरची एकूण संख्या वाढून १२,७११ झाली आहे.

पुढील तीन वर्षांत १ कोटी नवीन किराणा पार्टनर रिलायन्स रिटेलशी जोडले जातील. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोचे चेअरमन आणि सौदी अरेबियाच्या सॉव्हरीन वेल्थ फंड पीआयएफचे गव्हर्नर यासिर-अल-रमायन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी झाले.

मात्र, दोन्ही कंपन्यांत गेल्या दोन वर्षांपासूनच्या प्रस्तावित करारावर आतापर्यंत मतैक्य झाले नाही. मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. त्यांनी या वर्षात करार पूर्ण होईल,अशी आशा व्यक्त केली.

अंबानी म्हणाले, सौदी अरामकोचे चेअरमन यासिर-अल-रमायन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी झाले आहेत. अंबानी म्हणाले, यासिर-अल-रमायन यांचे आमच्या मंडळात सहभागी होणे रिलायन्सच्या आंतरराष्ट्रीयकरणाची सुरुवातही आहे.

अंबानी म्हणाले, 5जी चाचण्यांदरम्यान जियोने यशस्वीरीत्या १ जीबीपीएसहून जास्तीची स्पीड प्राप्त केली आहे. संपूर्ण देशात विस्तारलेल्या डेटा सेंटर्सवर ५जी स्टँड अलोन नेटवर्कला इन्स्टॉल केले आहे. 5जीची सुरुवात रिलायन्स करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जियोचे 5जी सोल्युशन भारतात यशस्वी ठरल्यास ते जगातील अन्य देशांत निर्यात केले जाईल. अंबानी म्हणाले, जियोने 5जीशिवाय एआय, मशीन लर्निंग आणि ब्लॉकचेनसारख्या अनेक तंत्रज्ञानात प्रावीण्य प्राप्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button