अहमदनगर

जिल्ह्यातील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘यांना’ मिळणार ५० हजाराचे अनुदान

अहमदनगर- कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

 

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना नियम आणि अटी शिथिल करून ५० हजार रुपये प्रोत्साहन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार २०१७ ते २०२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. पीक कर्जाची रक्कम ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

 

एकपेक्षा अधिक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

 

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

या योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेतले जाणार आहे.

 

यांना मिळणार नाही लाभ

म. फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. आजी, माजी मंत्री, राज्यमंत्री, आजीमाजी आमदार, खासदार, शासकीय अधिकारी-कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन २५ हजारा रूपयांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), महावितरण, एस टी महामंडळ व अनुदानित संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तीवेतन २५ हजारांपेक्षा जास्त आ हेत ती मंडळी (माजी सैनिक वगळून), बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा बँक, सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (मासिक वेतन रूपये २५ हजारापेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

Related Articles

Leave a Reply

Back to top button