ताज्या बातम्या

Renault VS Maruti Suzuki : Kwid कार की Alto ! 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत तुमच्यासाठी परवडणारी कार कोणती? जाणून घ्या…

तुम्ही कमी किमतीत या कार खरेदी करू शकता. 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत या तुमच्यासाठी सर्वोत्तम कार आहेत.

Renault VS Maruti Suzuki : भारतीय बाजारात सर्वसामान्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त खरेदी केलेली कार ही Maruti Suzuki अल्टो आहे. ही कार मध्यमवर्ग लोकांनी सर्वात जास्त पसंत केलेली कार आहे.

अशा वेळी अल्टो या कारला टक्कर देण्यासाठी बाजारात Renault Kwid ही कार आलेली आहे. Renault Kwid आणि Maruti Alto या बाजारात 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या दोन छान कार आहेत. दोन्ही कंपनीच्या फॅमिली कार आहेत ज्यात उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. या दोन्ही कारच्या मायलेज आणि फीचर्सबद्दल तुम्ही जाणून घ्या.

मारुती अल्टो टूर H1

Advertisement

या कारची एक्स-शोरूम किंमत 4.80 लाख रुपये आहे. कार रस्त्यावर 34 Kmpl चे प्रभावी मायलेज देते. कारला K-Series 1.0-litre Dual Jet आणि Dual VVT इंजिनचा पर्याय मिळतो. मारुती अल्टो टूर H1 मध्ये सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्ज, प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटरसह फ्रंट सीट बेल्ट, पुढच्या आणि मागील दोन्ही प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. कारला मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे आणि आर्क्टिक व्हाइट अशा तीन कलरमध्ये ही कार येते.

कारच्या सुरक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन देण्यात आले आहे

मारुतीच्या अल्टो टूर H1 मध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आहे. Maruti Alto Tour H1 ला जास्तीत जास्त 66.6Ps पॉवर मिळेल.

Advertisement

त्याच वेळी, त्याच्या CNG प्रकारात 56.6 Ps पॉवर मिळेल. तर, कार पेट्रोलमध्ये 89 Nm आणि CNG मोडमध्ये 82.1 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. कार पेट्रोलवर 24.60 kmpl आणि CNG वर 34.46 km/kg मायलेज देणारी कार आहे.

रेनॉल्ट क्विड

कारला शक्तिशाली 999 cc इंजिन आहे. हे इंजिन 67.06 Bhp पर्यंत पॉवर देते. एवढेच नाही तर या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. ही मस्त कार 22.3 kmpl पर्यंत मायलेज देते.

Advertisement

सुरक्षिततेसाठी, कारला ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर मिळतात. कारला 279 लीटर बूट स्पेस मिळते. ही कार बाजारात 4.70 लाख रुपयांपासून ते 6.33 लाख रुपयांपर्यंत एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. ही कार RXE, RXL, RXL (O), RXT आणि क्लिंबर या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

कारला सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल टोन शेड्स मिळतात

कारला सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल टोन शेड्स मिळतात. कारचे शक्तिशाली इंजिन 91 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या कारला अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्ले देण्यात आले आहेत. यात 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

Advertisement

कारला 14-इंच टायर, मॅन्युअल एसी आणि इलेक्ट्रिक ORVM देखील मिळतात. सुरक्षिततेसाठी, याला इलेक्ट्रॉनिक (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) मिळते. अशा प्रकारे ही तुमच्यासाठी एक उत्तम कार आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button