Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरनेवासा संगमनेर रस्ता तातडीने दुरुस्त करा - आमदार लहू कानडे

नेवासा संगमनेर रस्ता तातडीने दुरुस्त करा – आमदार लहू कानडे

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील नगरपरिषद हद्दीत असलेला नेवासा-संगमनेर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना आमदार लहू कानडे यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना केली आहे.

श्रीरामपूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार कानडे यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या प्रयत्नातून श्रीरामपूर शहराला जोडणारे बेलापूर, श्रीरामपूर, नेवासा श्रीरामपूर, खंडाळा-श्रीरामपूर,

गोंधवणी-श्रीरामपूर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु श्रीरामपूर शहर नगरपालिका हद्दीतील नेवसा नाका ते संगमनेर नाका हा रस्ता अतिशय महत्त्वाचा व जास्त रहदारी असलेला रस्ता आहे.

या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर एस.टी. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,

भाजी मार्केट, पोलीस स्टेशन, पेट्रोल पंप, व्हीआयपी गेस्ट हाऊस यांच्यासह विविध शासकीय कार्यालये, बाजारपेठ, छोटी-मोठी व्यवसायिक दुकाने आहेत.

त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्याचबरोबर शहरातील व परिसरातील तालुक्यामधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

नेवासा नाका ते संगमनेर नाका या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे सतत लहान- मोठे अपघात घडतात. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे चार चाकी व दुचाकी वाहनांसह सर्वांनाच या रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे.

त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने याकामी आपण लक्ष घालावे, मागणी यावेळी करण्यात आली.

आ. कानडे यांनी मुख्याधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली. तसेच रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली. तसे लेखी पत्र मुख्याधिकारी यांना दिले.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक थोरे, भगवान उपाध्ये, सुधीर वायखींडे, लक्ष्मण कुमावत, सिद्धांत छल्लारे,

तेजस बोरावके, संजय साळवे, प्रमोद गायकवाड, प्रकाश परदेशी, राजेंद्र बोरसे, बापू बुधेकर, रोहित नाईक, विवेक घुले, उमेश छल्लारे, पवन सूर्यवंशी,

शिवा पानसरे, जय औताडे, गोपाल अहिरराव, शरद गवारे, देवेंद्र पिडीयार, लोकेश नगरे, मोती व्यवहारे, सुहास परदेशी, विशाल पापडीवाल, सुरेश थोरे,

विशाल दुपाटी, संतोष भांबारे, बापू कदम, गोरख गुळवे, संतोष उदावंत, गणेश मुथा, डॉ. प्रशांत खैरनार, रवी सोनावणे, दत्तू करडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments