अहमदनगर

बनावट काॅलला प्रतिसाद दिला अन् माजी सैनिक सहा लाखाला फसले

अहमदनगर- एसबीआय युनो बँकमधून बोलतो, असे खोटे सांगून माजी सैनिक रविंद्रपाल जसवंत सिंग (वय 58 रा. जनरल अरूण वैद्य कॉलनी, जामखेड रोड, नगर) यांचा विश्‍वास संपादन करून त्यांची पाच लाख 93 हजार 897 रूपयांची ऑनलाईन फसवणुक केली आहे.

 

ही घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सोमवारी रात्रीच सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलनंबरवर सोमवारी दुपारी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला.

 

समोरच्या व्यक्तीने एसबीआय युनो बँक डिपार्टमेंटमधून बोलतोय, असे सांगून, तुमचे युनो एसबीआय अकाऊंट हे बंद झाले आहे. ते चालू करायचे आहे, असे सांगून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. युनो एसबीआय अकाऊंट चालू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, अशी बातावणी करून फिर्यादीकडून ओटीपी घेतला.

 

यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून पाच लाख 93 हजार 897 रूपये काढून घेत फसवणुक केली आहे. यासंदर्भात फिर्यादी यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button