अहमदनगर

पोलिसांकडून आयोजित रोजगार मेळाव्यास प्रतिसाद; ऐवढ्या तरूणांना मिळाली नोकरी

अहमदनगर- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने रोजगार आणि आरोपींचा आत्मसमर्पण मेळाव्याचे आयोजन रविवारी येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यास सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या पाल्यांसह होमगार्ड तसेच पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण महाराष्ट्रातून पारधी समाजातील तरूण रोजगार मेळाव्यासाठी हजर झाले होते. तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 57 मल्टीनॅशनल कंपन्यांनी युवकांच्या मुलाखती घेतल्या. 1860 तरूणांनी मेळाव्यात सहभाग घेतला. 1023 तरूणांना नियुक्ती मिळाली असून त्यातील 460 तरूणांना लाखो रूपयांचे पॅकेज असलेले नोकर्‍यांचे नियुक्तीचे पत्र तत्काळ उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आयुष्यामध्ये कोणतेही काम लहान समजू नका. लहान- सहान कामे करणारेच आयुष्यात मोठे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रामाणिकपणा, कष्ट आणि जिद्द ठेवून आयुष्याची वाटचाल करा. आपण जी दिशा निवडू त्यावर आपले जीवनाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर – पाटील यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button