अहमदनगर

निवृत्त पोलीस अंमलदाराला चोरट्याचा दणका; झाले असे

पोलीस दलातून निवृत्त झालेल्या अंमलदाराचा मोबाईल अज्ञाात चोरट्याने चोरला. सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास गाडगीळ पटांगण येथील भाजी मार्केटमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त पोलीस अंमलदार कुंडलिक सुगधराव आरवडे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे.

ते रविवारी सकाळी गाडगीळ पटांगण येथील भाजी मार्केटमध्ये गेले होते. तेथे चोरट्यांनी त्यांचा 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरला.

मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच आरवडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस नाईक दुधाळ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button