अहमदनगर

बनावट मद्य तयार करणाऱ्या ‘त्या’ दुकानाचा परवाना रद्द करा !

बनावट मद्य तयार करणाऱ्या बालाजी वाईन्स दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून करण्यात येत अाहे.

दाेन दिवसांपूर्वी पाेलिसांनी या दुकानावर धाड टाकून विविध नामांकित कंपन्यांची बनावट दारूसह साहित्य जप्त केले. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली.

बैठकीत या दुकानाचा परवाना कायम स्वरूपात निलंबित करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात अाला. दुकानात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दुकान व्यवस्थापकासह परवानाधारक दुकान मालकावर कठोर कारवाई करण्याबाबत अकोले तहसील कार्यालयावर धडक देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित उत्पादन शुल्क विभागासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात अाला.

शहराच्या मध्यवस्तीतील हे बालाजी वाईन्स शासनमान्य दुकान अाहे. तेथे खुलेआम बनावट मद्य तयार करून विकतात, हे पोलिसांकडून टाकलेल्या धाडीतून समोर आले. आता, मात्र या दुकानाचा परवाना कायम स्वरूपात निलंबित करावा, अशी मागणी हाेत अाहे.

प्रशासनाने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कोळपकर यांनी दिला

Related Articles

Leave a Reply

Back to top button