अहमदनगर
काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला तांदूळ पकडला

अहमदनगर- स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांनी आज गुरूवारी मार्केटयार्ड येथे कारवाई करून सुमारे 160 गोण्यात साठवून ठेवलेला रेशनचा तांदूळ पकडला.
यासंदर्भात पोलीस कर्मचारी सुजय हिवाळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सना चांद बेग (रा. भाळवणी, ता पारनेर) व दीपक ताराचंद बोथरा (वय 55, रा. माणिकनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पिकअप व रेशनचा तांदूळ असा दोन लाख 99 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरूवारी सकाळी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मार्केटयार्डमधील बोथरा यांच्या गाळ्याजवळ एक पीकअप गाडी रेशनचा तांदूळ घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपले अधिकारी, कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह संयुक्त कारवाई करत गोणीमधील तांदूळ पकडला.