Health Tips : पेनकिलर गोळ्या, औषधींचे वारंवार सेवन केल्यास अल्सरचा धोका
अशा वेळीसुद्धा अनेक जण वारंवार गोळ्या घेताना दिसतात. मात्र, डॉक्टरांचा कुठलाही सल्ला घेतला जात नाही; परंतु पेनकिलर गोळ्या, औषधींचे वारंवार सेवन केल्यास अल्सरचा धोका होऊ शकतो.

Health Tips : थकवा जाणवत असताना तसेच अंगदुखी, ताप, डोके दुखत असले तरीही अनेकांना पेनकिलर गोळ्या घेण्याची सवय झालेली असते. वाढत्या वयात व्याधीदेखील वाढू लागतात.
अशा वेळीसुद्धा अनेक जण वारंवार गोळ्या घेताना दिसतात. मात्र, डॉक्टरांचा कुठलाही सल्ला घेतला जात नाही; परंतु पेनकिलर गोळ्या, औषधींचे वारंवार सेवन केल्यास अल्सरचा धोका होऊ शकतो.
छोट्या-छोट्या आजारांवर नेहमी पेनकिलर औषधी घेऊ नयेत, त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊन अल्सरचा त्रास होऊ शकतो.
नागरिकांनी अंगदुखी व इतर आजारांसाठी थेट मेडिकलमध्ये जाऊन औषधी गोळ्या घेणे योग्य नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधी, गोळ्या घेऊ नये, विना सल्ल्याने औषधी घेतल्यास विविध परिणामांना सामोरे जावे लागते. काही वेळेस आतड्यांचा अल्सर होऊ शकतो
वारंवार पेनकिलर नकोच
वारंवार वेदनाशामक अर्थात पेनकिलर औषधी घेऊ नये. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, तसेच इतर कुठल्याही आजारांवरील औषधे गोळ्या घेताना त्यापूर्वी त्या आजाराचे निदान होणे गरजेचे असते. अनेकदा आजार एक आणि गोळ्या दुसऱ्याच घेतल्या, असेही होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले असते
काय काळजी घ्याल ?
किरकोळ अंगदुखी असेल तर रुग्णांनी काळजी घ्यावी, आराम करावा, तसेच हलकासा व्यायाम करावा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधी घ्यावी. दररोज व्यायाम,
योगा करावा यामुळे आरोग्य चांगले राहू शकेल, पेनकिलर अधिक प्रमाणात घेतल्यास बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेणे घातक ठरु शकते. त्यामुळे सल्ला महत्त्वाचा आहे.
लहान आतड्याचा अल्सर
पेनकिलर अधिक प्रमाणात घेतल्यास संबंधितांना लहान आतड्याचा अल्सर होण्याचा धोका अधिक असतो.
मोठ्या आतड्याचा अल्सर
तापाची औषधी व पेनकिलर गोळ्या अधिक सेवन केल्याने, अनेकदा त्याचे दुष्परिणाम दिसतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
धोका कुणाला?
वेदनाशामक औषधी वारंवार घेतल्यास तोंड कोरडे पडते. फोड येऊ शकतात. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणजे आजार वाढणार नाही.