अहमदनगर

युवकाला लुटले; ‘त्या’ दोघांना पोलिसांनी जेरबंद केले

नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील युवक आदित्य अविनाश आळेकर (वय 21) याला शिवीगाळ करत लुटणार्‍या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी गजाआड केले.

सचिन गोपिनाथ चव्हाण (वय 21) व रघुनाथ भारत बर्डे (वय 27 दोघे रा. चौभा पिंपळगाव ता. आष्टी जि. बीड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. 28 जानेवारी, 2022 रोजी दुपारी आदित्य आळेकर हा युवक वारूळवाडी (ता. नगर) रोडने देवदर्शनासाठी जात होता.

त्यावेळी दुचाकी (एमएच 23 बीडी 8163) वरून आलेल्या दोघांनी आदित्यला आडवून शिवीगाळ केले. त्याच्या खिशातील तीन हजार 400 रूपये रोख रक्कम, 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा 18 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल लुटला होता.

या प्रकरणी आदित्य याने भिंगार पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button