मायक्रोफायन्सचे कार्यालय फोडून चोरला ऐवज

ऐबेलस्टार मायक्रोफायन्सचे कार्यालय चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम, लॉकर, चेक बुक, रेन्ट अॅग्रीमेंन्ट व इतर शाखेच्या चाव्या असा 89 हजार 572 रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
गुरूवारी रात्री सावेडी उपनगरातील पाईपलाइन रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी निलेश विष्णुदास बैरागी (वय 40 रा. श्रीरंगनगर, शेंडीबायपास) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी ऐबेलस्टार मायक्रोफायन्स हे कार्यालय गुरूवारी सायंकाळी सात वाजता बंद केले होते. यानंतर चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
उचकापाचक करून रोख रक्कम, लॉकर, चेक बुक, रेन्ट अॅग्रीमेंन्ट व इतर शाखेच्या चाव्या चोरून नेल्या आहेत. चोरीचा हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता लक्षात आला.
ऐबेलस्टार मायक्रोफायन्सच्या अधिकार्यांनी तत्काळ तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक संभाजी बडे करीत आहेत.