अहमदनगर

आता रोहित पवारांही झाली कोरोनाची लागण ! म्हणाले त्याने मला गाठलंच…

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यांची तब्येत व्यवस्थित असून ते घरीच उपचार घेत असल्याच सांगण्यात आलेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटेलय की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो,

पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!

राज्यात आतापर्यंत डझनभर मंत्री आणि अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, केसी पाडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांच्यासह एकूण १० मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

याशिवाय भाजपा आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

या नेत्यांना कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
माजी मंत्री पंकजा मुंडे
आमदार धीरज देशमुख !

Related Articles

Leave a Reply

Back to top button