ताज्या बातम्या

Rolls-Royce Cullinan : मुकेश अंबानी, रतन टाटा नव्हे तर ‘या’ व्यक्तीने सर्वप्रथम रोल्स रॉयस खरेदी केली, जाणून घ्या इतिहास रचणारा हा भारतीय कोण आहे….

देशात श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांच्या आधी रोल्स रॉयस खरेदी करून या भारतीयाने इतिहास रचला आहे. त्याने भारतात सर्वात आधी ही कार खरेदी केली होती.

Advertisement

Rolls-Royce Cullinan : पैसा असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. देशात सर्वांनाच कार खरेदी करायची असते, मात्र प्रत्येकजण स्वतःच्या बजेटनुसार कार खरेदी करत असतो. अशा वेळी तुम्हालाही Rolls-Royce कारबद्दल माहीतच असेल.

असे असताना तुम्हालाही प्रश्न पडला असेल की देशात सर्वात आधी ही आलिशान कार कोणी खरेदी केली असेल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याने सर्वात आधी ही कार खरेदी केली आहे. ही कार खरेदी करणारे मुकेश अंबानी, रतन टाटा नाहीत तर हा देशातील एक बिजनेसमॅन आहे. ज्याने सर्वात आधी रोल्स रॉयस कुलीनन ही कार खरेदी केली आहे.

तसे पाहिले तर मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना अनेक महागड्या कार आवडत. मात्र रोल्स रॉयस कुलीनन ही कार खरेदी करण्यात ते मागे पडले असून भारतातील Aries समूहाचे CEO सोहन रॉय यांनी ही कार सर्वात आधी खरेदी केली आहे.

Advertisement

Aries समूहाचे CEO सोहन रॉय यांनी त्यांची पत्नी अभिनी सोहन हिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून रोल्स रॉयस कुलीनन खरेदी केली. ही कार खरेदी करणारे ते पहिले व्यक्ती होते.

सोहन रॉय यांनी सांगितले होते, ‘मला नेहमीच रोल्स रॉइस आवडते. आमच्या 25 व्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त मी माझी पत्नी अभिनी सोहनला काहीतरी खास भेट देण्याचा विचार करत होतो आणि काहीतरी अनोखे शोधत होतो. त्या वेळी त्यांनी 2018 मध्ये लॉन्च करण्यात आलेली Rolls-Royce Cullinan ही कार बुक केली व पत्नीला वाढदिवसाला भेट दिली होती.

Advertisement

कोण आहे सोहन रॉय?

सोहन रॉय यांची पत्नी अभिनी सोहन या Aries Interiors च्या MD आहेत, ज्याचे मुख्यालय UAE मध्ये आहे. सोहन रॉय हे Aries ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, अध्यक्ष आणि CEO आहेत. सोहन रॉय यांनी आपल्या करिअरची सुरुवात मरीन इंजिनीअर म्हणून केली आणि 1998 मध्ये अॅरिझ मरीन अँड इंजिनीअरिंग सेवा सुरू केली.

सोहन रॉय यांनी DAM999 या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे आणि Arise Group ने मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचे Visamayas Max स्टुडिओ कॉम्प्लेक्स देखील विकत घेतले आहे. ते कॉन्सेप्ट इंडीवूडचे संस्थापक-दिग्दर्शक, इंडीवूड बिलियनेअर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button