ताज्या बातम्या

Royal Enfield Electric Bullet : बुलेटप्रेमींसाठी गोड बातमी! बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी येतेय इलेक्ट्रिक बुलेट, रिवर्स मोडसह असणार शक्तिशाली फीचर्स…

रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट एका चार्जवर 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते आणि 110 किमी प्रतितास इतका वेग आहे.

Royal Enfield Electric Bullet : रॉयल एनफिल्ड ही बाइक कोणाला आवडत नाही असे होणारच नाही. देशात लाखो लोक ही बाइक खरेदी करत आहेत. अशा वेळी आता बुलेटप्रेमींसाठी एक गोड बातमी आलेली आहे.

कारण आता बाजारात कंपनी रॉयल एनफिल्डचे इलेक्ट्रिक अवतार लॉन्च करणार आहे. पण त्याआधी आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक बुलेटची ओळख करून देणार आहोत. ही बाईक बेंगळुरूस्थित बुलेटियर कस्टम्सने बनवली आहे आणि विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक बुलेटचे नाव ‘गॅसोलीन’ आहे. तुम्हीही या इलेक्ट्रिक बुलेटविषयी जाणून घ्या…

अलीकडेच, फर्मने रॉयल एनफिल्डची प्रसिद्ध बाइक 1984 मॉडेल बुलेट इलेक्ट्रिक अवतारात विकसित केली आहे. याबाबत कंपनीचे संस्थापक रिकार्डो परेरा यांनी या इलेक्ट्रिक बुलेटबद्दलचे सर्व डिटेल्स सांगितले आहे.

इलेक्ट्रिक बुलेटची कल्पना कशी सुचली?

रिकार्डो यांच्या म्हणण्यानुसार 1984 मॉडेल रॉयल एनफिल्ड बुलेट भेट दिली होती, जी पारंपारिक गियर सिस्टमसह आली होती. त्याला आपल्या मुलाला इलेक्ट्रिक बाइक द्यायची होती आणि इथूनच त्याला त्याच्या जुन्या बुलेटचे इलेक्ट्रिक अवतारात रूपांतर करण्याची कल्पना सुचली. यासाठी त्यांनी जुन्या बाईकमध्ये अनेक बदल केले, जसे की बाईकच्या लुक आणि डिझाइनवर तसेच मेकॅनिझमवर महिनोंमहिने काम केले.

Royal Enfield Gasoline

रिकार्डोने सांगितले की, बाईकला बॉबर लूक देण्यासाठी, चेसिस 3 इंचांनी लांब करण्यात आली आहे, याशिवाय, त्यात नवीन डिझाइनची इंधन टाकी देण्यात आली आहे. इंजिनचा भाग काढून तेथे बॅटरीला जागा देण्यात आली आहे.

तसेच बॅटरी झाकण्यासाठी खास डिझाइन केलेले कव्हर बनवण्यात आले आहे, जे मोठ्या इंजिनासारखे दिसते. ते इंधन टाकीच्या अगदी खाली ठेवलेले आहे. बाईकचा कंट्रोलर इंधन टाकीमध्ये ठेवण्यात आला आहे, जो विविध ड्रायव्हिंग मोड ऑफर करतो. त्याचा कंट्रोलर नायट्रो बूस्ट सिस्टम देखील प्रदान करतो, ज्यामुळे बाईकची मोटर सुरुवातीच्या 5 सेकंदांसाठी जोरदार शक्तिशाली आहे.

ड्राइविंग रेंज आणि परफॉर्मेंस

इलेक्ट्रिक बुलेट बनवण्यासाठी 5 kW क्षमतेची BLDC हब मोटर मुंबईस्थित Gogo A1 फर्मकडून घेण्यात आली आहे. याशिवाय, बेंगळुरू स्थित Microtek कडून मिळवलेला 72 V 80 Ah बॅटरी पॅक वापरला गेला आहे. ही बाइक रेग्युलर मोडमध्ये 90 किमी आणि इकॉनॉमी मोडमध्ये 100 किमीपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देते.

त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात आणि ती 15 अँपिअरच्या घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून चार्ज केली जाऊ शकते. त्याचा टॉप स्पीड 110 किलोमीटर प्रति तास आहे.

बाईक रिव्हर्स मोडमध्ये देखील चालेल:

बुलेट इलेक्ट्रिकमध्ये तीन वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले असून त्यात रिव्हर्स मोडचाही समावेश आहे. म्हणजेच तुम्ही बाइक रिव्हर्स मोडमध्येही चालवू शकता. यामध्ये गिअर लीव्हरऐवजी मोड स्विच गिअर्स देण्यात आले आहेत.

ज्यामधून तुम्ही वेगवेगळे मोड निवडू शकता. या बाईकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात बेल्ट किंवा चेन सिस्टीम नाही, म्हणजेच इलेक्ट्रिक हब मोटर मागील चाकामध्येच बसवण्यात आली आहे, जी थेट मागच्या चाकाला पॉवर देते.

इलेक्ट्रिक अवतारात या बाइकला तयार करण्यासाठी स्टँडर्ड मॉडेलचे इंजिन 45 किलोग्रॅम होते आणि त्यात वापरलेल्या बॅटरीचे वजन 37 किलो होते. रिकार्डो सांगतात की, बाईकमध्ये कस्टमायझेशन केल्यानंतर तिचे वजन खूपच कमी झाले आहे. नियमित पेट्रोल मॉडेल 161 किलोग्रॅमच्या आसपास असताना, इलेक्ट्रिक मॉडेलचे वजन फक्त 145 किलोग्रॅम आहे, जे त्यास चांगली ड्रायव्हिंग रेंज ठेवण्यास मदत करते.

या इलेक्ट्रिक बुलेटचे नावही खूप वेगळे आहे. रिकार्डो म्हणतो की, मला नेहमीच्या पेट्रोल बाईकला ट्रिब्यूट नाव द्यायचे होते. म्हणूनच आम्ही या बाईकसाठी ‘गॅसोलीन’ हे नाव निवडले आहे. हे थोडे विचित्र वाटते परंतु इलेक्ट्रिक बाइकसाठी गॅसोलीन हे नाव वापरल्याने ते देखील मनोरंजक बनते.

याशिवाय, ही बुलेट सामान्य इलेक्ट्रिक दुचाकीप्रमाणे पूर्णपणे सायलेंट आहे. तसेच ही बाईक बनवण्यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाल्याचे रिकार्डो यांनी सांगितले आहे. .

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button