ताज्या बातम्या

Rule Change From 1st August : 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 3 नियम ! अनेकांना बसणार आर्थिक झटका; जाणून घ्या

जुलै महिना संपणार आहे. चार दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. 1 ऑगस्टपासून पैशांशी संबंधित काही नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

Rule Change From 1st August : प्रत्येक महिन्यांच्या सुरुवातीला अनेक सरकारी नियमांत बदल केले जातात. यामुळे अनेकांना फायदे व तोटे दोन्ही सहन करावे लागतात. अशा वेळी आता जुलै महिना संपत आला असून ऑगस्ट महिना सुरु होणार आहे.

अशा वेळी 1 ऑगस्टपासून पैशांशी संबंधित काही नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. त्यामुळे या महिन्यात सरकार कोणकोणते बदल करेल तसेच कोणते नवीन नियम लागू होतील, ज्यामुळे तुमचे आर्थिक बजेट ढासळू शकते याविषयी तुम्ही जाणून घ्या.

एलपीजीच्या किमती बदलू शकतात

Advertisement

सर्वसामान्य लोकांसाठी LPG च्या वाढत्या दरांमुळे खूप फटका बसत आहे. आधीच महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना आता LPG चे दर वाढण्याचे संकेत दिसत आहेत.

एलपीजीच्या किमती सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडर तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. या कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. याशिवाय पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे दरही बदलू शकतात.

ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील

Advertisement

तसे पाहिले तर पुढील महिन्यात अनेक सण येत आहेत. ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्या असतात. रक्षाबंधन, मोहरम आणि इतर अनेक सणांमुळे विविध राज्यांमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.

यासोबतच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासू शकता. त्यामुळे तुमची बँकांसंबंधी सर्व कामे तुम्ही लवकर उरकून घ्या.

आयटीआरसाठी दंड भरावा लागेल

Advertisement

आर्थिक वर्ष 2022-23 म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. या शेवटच्या तारखा त्या करदात्यांच्या आहेत ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही.

या तारखेपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. उशीरा आयटीआर फाइलिंगसाठी करदात्यांना 1,000 रुपये किंवा 5,000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button