Rule Change in July : चप्पल- बुटांपासून ते बँकेपर्यंत, आजपासून लागू होणार हे महत्वाचे नियम; अडचणीत येण्यापूर्वी एकदा जाणून घ्या…
आज 1 जुलै तारीख आहे. अशा वेळी आज अनेक महत्वाचे नियम बदलले आहेत. याचा फायदा व तोटा तुम्हाला सहन करावा लागणार आहे.

Rule Change in July : आजपासून जुलै महिना सुरु होत आहे. अशा वेळी नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक महत्वाचे बदल घडत असतात. हे सर्व नियम तुमच्या आयुष्याशी संबंधित असतील. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागत असते.
दरम्यान, आजपासून बँकेपासून ते बूट किंवा चप्पल याबाबत अनेक नियम बदलणार आहे. ते कोणकोणते नियम आहेत हे तुम्ही याठिकाणी जाणून घ्या.
सर्व प्रथम, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढू शकते. तसेच पीएनजी आणि सीएनजीच्या दरातही बदल होणार आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. 1 जुलैपासून काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.
एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण
एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून अंमलात येईल. या विलीनीकरणानंतर, HDFC बँकेचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ती रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे.
फुटवेयर कंपन्यांसाठी QCO अनिवार्य
निकृष्ट दर्जाच्या चप्पलवर 1 जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे. देशभरात गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) लागू करणे हे त्यामागचे कारण आहे. हे सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य आहे. यानंतर सर्व कंपन्यांना चांगल्या दर्जाचे शूज आणि चप्पल बनवावी लागणार आहे. सध्या 27 फुटवेअर उत्पादने QCO अंतर्गत आणण्यात आली आहेत.
पॅन-आधार लिंक
जर तुम्ही तुमचा पॅन 30 जूनपर्यंत आधारशी लिंक केला नसेल तर तुम्ही 1 जुलैपासून ते करू शकणार नाही. यामुळे तुमचा पॅन निष्क्रिय होईल.
एलपीजी किमती
तेल वितरण कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. या वेळी 1 जुलै रोजी व्यावसायिक तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जूनमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली होती. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर कायम आहे. अशा प्रकारचे महत्वाचे बदल हे आजपासून लागू झाले आहेत.