ताज्या बातम्या

Russia Ukraine war : तो किराणा आणण्यासाठी बाहेर गेला आणि ..यूक्रेनमध्ये मृत्यू झाला !

Russia Ukraine war :- सकाळीच भारताने युक्रेनमधील भारतीयांना (Indian Student in Ukraine) अलर्ट दिला होता. रशिया-युक्रेनमधील हे युद्ध आणखी स्फोटक वळणावर आले आहे. कारण यात आता एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death) झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

युक्रेनध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थ्यी अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे.

युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल (Missile) हल्ले होत आहेत. या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यावर खारकीवमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे इतर भारतीय विद्यार्थ्याचेही धाबे दणाणले आहेत. भारत सरकार यानंतर मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.

घमासान युद्ध सुरू असताना किराणा आणायला जाणं नवीनच्या जीवावर बेतलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी टाहो फोडला आहे. तर देशभरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भारत सरकार यानंतर तातडीने बैठक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आणखी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा अशी याचना सध्या भारतीय विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. रशियाच्या न्युक्लिअर हल्ल्याच्या भीतीने सध्या जग दहशतीखाली आहे. न्युक्लिअर हल्ल्याच्या धमकीने अनेक देशांना धडकी भरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button