शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

बहुजन समाजासाठी अविरतपणे परिश्रम घेऊन सामाजिक. राजकीय. उद्योग. सहकार सांस्कृतिक .शैक्षणिक आदी क्षेत्रात कार्य करून तळागाळापर्यंत ज्ञानगंगा घेऊन जाणारे शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे तथा आबा यांच्या नावाने राज्य साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश दादा मुळे यांनी दिली.
शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे तथा आबा यांच्या पुण्यतिथी (स्मृती) दिनाच्या निमित्ताने हे साहित्य पुरस्कार दरवर्षी 21 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहेत . पुरस्कार निवड समितीने ग्रंथ परीक्षण करून निकाल जाहीर केला आहे.
शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे साहित्य गौरव पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवार दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ठिक 4:00 वाजता संपन्न होत आहे , अशी माहिती संस्थेचे सचिव प्राचार्य एम.एम. तांबे व उपाध्यक्ष दत्ता पाटील नारळे यांनी दिली. सदर कार्यक्रमास साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे साहित्य गौरव पुरस्कार २०२१ सालाचा निकाल पुढीलप्रमाणे:- सत्यशोधकीय नियतकालिके लेखक डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर- संशोधन), माझ्या ह्यातीचा दाखला कवी .विशाल इंगोले (लोणार बुलढाणा- कवितासंग्रह) शिरवळ लेखक हरिश्चंद्र पाटील (सोलापूर- कथासंग्रह) फिरत्या चाकावरती प्रा .डॉ बाबुराव उपाध्ये (श्रीरामपूर – आत्मकथन) तसेच २०२२
या सालातील साहित्य पुरस्कार पुढील प्रमाणे :- जीवनाचा उपासक लेखक इंद्रजित पाटील (सोलापूर- चरित्र) नीलमोहर कवयित्री सौ. जयश्री वाघ (नाशिक- कवितासंग्रह) कुचंबना लेखक विशाल मोहोड (अमरावती- कथासंग्रह ) गाव कवेत घेताना लेखक विजयकुमार मिठे( नाशिक- ललित ) माहेलका लेखक अशोक निंबाळकर (कर्जत- कादंबरी) या साहित्यकृतींना हे ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत,
असे पुरस्कार निवड समितीच्या वतीने पुरस्कार निवड समितीचे कार्यकारी समन्वयक साहित्यिक प्रा गणेश भगत यांनी २०२१ व २०२२या दोन वर्षीचा साहित्य पुरस्काराची घोषणा केली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश दादा मुळे, उपाध्यक्ष- दत्ता पाटील नारळे , सचिव- प्राचार्य एम. एम तांबे, खजिनदार- बी.के पाडळकर. प्रा. लालचंद हराळ. डॉ. महेश मुळे, सौ मीनाताई पोटे. सुनील म्हस्के. नीलिम काळदाते. सुधाकर सुंबे पुरस्कार निवड समिती सदस्य साहित्यिका प्रा. मेधाताई काळे. प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यावेळी उपस्थित होते.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश दादा मुळे, उपाध्यक्ष- दत्ता पाटील नारळे , सचिव- प्राचार्य एम. एम तांबे, खजिनदार- बी.के पाडळकर. प्रा. लालचंद हराळ. डॉ. महेश मुळे, सौ मीनाताई पोटे. सुनील म्हस्के. नीलिम काळदाते. सुधाकर सुंबे पुरस्कार निवड समिती सदस्य साहित्यिका प्रा. मेधाताई काळे. प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यावेळी उपस्थित होते.