Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : सैनिक सहकारी बँकेचे ११ संचालक बिनविरोध ! ...

Ahmednagar News : सैनिक सहकारी बँकेचे ११ संचालक बिनविरोध ! आ.निलेश लंके तळ ठोकून, सहा जागांचा मात्र तिढा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या

या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीत १७ पैकी ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ६ जागांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान होईल. १२ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या १७ संचालकासाठी जानेवारीत निवडणूक जाहीर झाली. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ११ संचालकांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गुरुवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके सैनिक बँकेमध्ये तळ ठोकून होते.

विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव व्यवहारे यांच्यासह कारभारी पोटघन मेजर व बाळासाहेब नरसाळे यांच्यामध्ये समझोता करत १७ पैकी ११ जागा बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले. उर्वरित सहा जागेवर तोडगा न निघाल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील १२ जागापैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. यात कारभारी पोटघन मेजर, माजी संचालक संतोष गंधाडे, संजय तरटे, शिवाजी सुकाळे, संतोष मापारी, जयसिंग मापारी, अशोक खोसे, बाळासाहेब नरसाळे,

धर्माजी मते यांना संधी मिळाली. महिला राखीव मतदारसंघात अनिता भाऊसाहेब भोगाडे, लीलावती गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. सहा जागांसाठी मतदान होणार आहे.त्यामुळे आता ही लढत चांगलीच रंगतदार होईल यात शंका नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments