Samsung Galaxy M14 5G : सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळतेय जबरदस्त ऑफर, हजारो रुपयांनी बचत करण्याची संधी; जाणून घ्या…
सॅमसंगच्या नवीन 5G फोनवर जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. यामध्ये तुमचे हजारो रुपयांनी बचत होणार आहे.

Samsung Galaxy M14 5G : स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या सर्वांना एक चांगली संधी आलेली आहे. यामध्ये तुम्ही सॅमसंगचा स्वस्त 5G फोन स्वस्तात घरी घेऊन येऊ शकता.
ही खास ऑफर Samsung Galaxy M14 5G वर आहे. हा फोन तुम्ही जवळपास 12 हजार रुपये किमतीत खरेदी करू शकता. हा फोन दमदार फीचर्ससह येतो. यामध्ये तुम्हाला 50MP मेन लेन्स, 6000mAh बॅटरी आणि मोठी स्क्रीन सारखे फीचर्स मिळतात. यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घ्या.
हा फोन 14,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता, जो आता स्वस्तात उपलब्ध आहे. सॅमसंगच्या अधिकृत साइटवर हा फोन 12,490 रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध आहे.
म्हणजेच या फोनवर ग्राहकांना आकर्षक सूट देण्यात येत आहे. जर तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन हवा असेल तर तुम्ही तो वापरून पाहू शकता. तसेच तुम्ही यावर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल जाणून घेऊ शकता.
किती रुपयात फोन मिळतो?
सॅमसंगने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. त्याचा 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,490 रुपयांना येतो, तर त्याचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,490 रुपयांना उपलब्ध असेल. तुम्ही हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता – बेरी ब्लू, स्मोकी टील आणि आइसी सिल्व्हर.
फोनवर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय आणि निवडक बँकांच्या पूर्ण पेमेंटवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही हा फोन EMI वर देखील खरेदी करू शकता.
या फोनची वैशिष्ट्य काय आहेत?
Samsung Galaxy M14 5G मध्ये 6.6-इंचाची LCD स्क्रीन आहे, जी फुल HD+ रिझोल्यूशनसह येते. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतो. हा M-सिरीज फोन Exynos 1330 प्रोसेसरवर काम करतो. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्याय आहे.
यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याची मुख्य लेन्स 50MP चा आहे. याशिवाय, तुम्हाला 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळतात. त्याचबरोबर समोर 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच या स्मार्टफोनला, 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 25W चार्जिंगला सपोर्ट देते. तसेच सुरक्षेसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.