लेटेस्ट

सॅमसंगचा गॅलॅक्सी M33 हा 5G फोन भारतात झाला लॉन्च

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा M सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर केली जाईल. डार्क ब्लू, खाकी ग्रीन आणि ब्राउन अशा तीन रंगात फोन लाँच केला आहे.

फीचर्स
फोनला 6.6 इंची TFT फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
फोनमध्ये 5G चिपसेट Exynos 1280 octa-core SoC चा वापर करण्यात आला आहे.
चिपसेट 2.4GHz क्लॉक स्पीडसह ऑक्टा-कोर फॉर्मेशनमध्ये असेल.
फोनमध्ये फोटोसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

कॅमेरा
फोनमध्ये फोटोसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स, तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी
फोनला 6,000mAh बॅटरी, 25W USB Type C फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनला रिवर्स चार्जिंग फीचरही देण्यात आलं आहे. या फोनसह चार्जर मिळणार नसल्याची माहिती आहे.

दोन वेरिएंट मध्ये उपलब्ध
6GB आणि 8GB सह इंटरनल स्टोरेज 128GB असेल. Micro-SD कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकतं. यात वर्चुअल एक्सपेंशन फीचरही आहे.

किंमत
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये असू शकते. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये असू शकते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button