अहमदनगर

या ठिकाणी खुलेआम होतेय वाळू तस्करी मात्र प्रशासनाकडून डोळेझाक

राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदीपात्रात बेकायदा बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दरम्यान, याबाबत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले असून त्या बेकायदा वाळू उपशाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने महसूलची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

दरम्यान गेल्या 15 दिवसात बाहेरील वाळू तस्करांनी बोटीनेच वाळू उपसा करून सुमारे 2 हजाराहून अधिक ब्रासचा वाळू उपसा केल्याने राहुरीचा महसूल बुडाला आहे.

तेथील बोट ताब्यात घेऊन तातडीने ही वाळू तस्करी बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चिंचोली परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. त्याकडे महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.

वाळू तस्करीला विरोध करणार्‍यांना चक्क गावठी कट्टे दाखविण्यात येत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

यावर नागरिकांनी महसूल प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. वाळू तस्करीकडे महसूल प्रशासनाचा कोणताही अधिकारी फिरकत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button