अहमदनगर

संजय गांधी निराधार,श्रावणबाळ लाभार्थ्यांना दिलासा; नगर जिल्ह्यासाठी आले ‘इतके’ कोटी

अहमदनगर- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर 2022-23 या कालावधीच्या खर्चासाठी 25 कोटी रूपयांच्या रकमेस मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या 64 लाख 6 हजार 100 रूपयांचा समावेश आहे.

 

तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी 2022-23 या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते मार्च 2023 करीता 30 कोटी रूपयांचे अनुदान वितरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील या योजनेखालील लाथार्थ्यांना 92 लाख 37 हजार 600 रूपयांचा समावेश आहे.

 

संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना एकूण 1 कोटी 56 लाख 43 हजार 700 रूपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button