अहमदनगर

सराईत गुन्हेगार गुंड्या 29 तोळ्यासह एलसीबीने पकडला

अहमदनगर- सराईत गुन्हेगार स्वरूप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे (वय 25 रा. अंतापूर ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला एलसीबीने अटक केली आहे. त्याने पाथर्डी व नगर तालुक्यात दिवसा तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 11 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 29 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.

 

कल्पना विलास साठे (वय 48 रा. नारायणडोह ता. नगर) यांचे घर 1 जुलै, 2022 रोजी फोडून एक लाख 62 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथक काम करत होते.

 

सदरचा गुन्हा गुंड्या काळे व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुंड्या काळे याचा शोध घेवून त्याला अटक केली. त्याने विविध गुन्ह्यात चोरी केलेले 29 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले.

 

काळे याने तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. त्याच्याविरूध्द औरंगाबाद व नगर जिल्ह्यात दरोड्याचे सहा गुन्हे पाथर्डी, गंगापूर, वाळुंज पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button