ताज्या बातम्या

Sarkari Job 2023 : महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! पगार 1 लाखांपेक्षा जास्त; लगेच करा अर्ज

या नोकरीसाठी महिला अर्ज करू शकतात. यामध्ये महिलांना 1 लाखांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे.

Sarkari Job 2023 : आजकाल मोठ्या प्रमाणात महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरी शोधत असतात. कुटुंबाला त्यांच्या नोकरीचा खूप हातभार लागत असतो. अशा वेळी आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे.

कारण आता महिला 1 लाखांपेक्षा जास्त पगार असलेल्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. ही भरती झारखंड राज्यात केली जात आहे.

झारखंड कर्मचारी निवड आयोगाने महिला पर्यवेक्षक स्पर्धा परीक्षा 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. त्याद्वारे राज्यात महिला पर्यवेक्षकांच्या 444 पदांवर भरती करण्यात येत आहे. या पदांपैकी 187 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 101 अनुसूचित जाती, 35 अनुसूचित जमाती, 35 मागासवर्गीय, 42 अतिमागास प्रवर्गासाठी आणि 44 जागा EWS साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Advertisement

या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 26 सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर आहे. अर्जाचे शुल्क 27 ऑक्टोबरपर्यंत जमा करता येईल. उमेदवार अधिकृत वेबसाइट panjikaran2023.com वर जाऊन अर्ज करू शकतात.

कोण अर्ज करू शकतो?

अर्ज करणार्‍या महिलांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा गृहविज्ञान या विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच महिलांचे वय 21 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Advertisement

पगार किती असणार आहे?

या पदांवर नियुक्त केलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स स्तर 6 अंतर्गत 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल.

निवड कशी होईल?

Advertisement

संगणक आधारित परीक्षेद्वारे भरती अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तसेच या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

JSSC JLSCE भर्ती 2023 अधिसूचना क्लिक करा

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button