Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : प्रवासी म्हणून बसले अन् गाडीच घेऊन गेले..!जीपीएस लोकेशनच्या मदतीने...

Ahmednagar News : प्रवासी म्हणून बसले अन् गाडीच घेऊन गेले..!जीपीएस लोकेशनच्या मदतीने अवघ्या अर्धा तासात तिघे जेरबंद

Ahmednagar News : गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशांनी चालकावर चाकूने हल्ला करत कारसह मोबाईल घेऊन फरार झाले.

मात्र बेलवंडी पोलिसांनी कारमध्ये असलेल्या जीपीएस लोकेशनच्या मदतीने अवघ्या अर्धा तासात कारसह तिघांना ताब्यात घेतले.

अमोल रमेश गोटे ३० वर्षे रा सणसवाडी, दिपक बाळु ढेरंगे ३१ वर्षे, निलेश कैलास पगारे ३२ वर्षे दोघे रा. कोरेगाव भिमा ता. शिरुर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर येथील नालेगाव परिसरात राहणारे ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड हे दि.१५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सियाज गाडी (क्र एम.एच१२ एम. एक्स ३४३१) ने पुणे येथून नगरकडे येत असताना वाघोली परिसरात तीन जणांनी गाडीला हात दाखवीत शिर्डी येथे जायचे असल्याचे सांगत नगर पर्यंत सोडण्याची विनंती केली.

रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाडेगव्हाण परिसरात आले असता ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर अमोल रमेश गोटे, दिपक बाळु ढेरंगे, निलेश कैलास पगारे या तिघांनी चाकू हल्ला करत मारहाण करून चारचाकी कार तसेच मोबाईल घेऊन फरार झाले.

याबाबत सुपा पोलिस ठाण्यात माहिती समजताच पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता गाडीचे जीपीएस लोकेशन हे बेलवंडी पोलिस स्टेशन हद्दीत असल्याचे दिसुन आले. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बेलवंडी येथील चिभळे चौकात नाकाबंदी करत अवघ्या अर्धा तासात तीन आरोपीसह गाडी ताब्यात घेतली.

त्यांच्या ताब्यातून बळजबरीने हिसकवुन नेलेली कार व धाक दाखविण्यासाठी वापरलेले हत्यार व दोन मोबाईल जप्त केले. याबाबत अधिक तपास करण्याकरिता सदर आरोपी व जप्त मुद्देमाल सुपा पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments