अहमदनगर

ज्येष्ठ नागरिकांसाठी शनिवारी मूत्रविकार जागृती व्याख्यान

वाढत्या वयोमानानुसार लघवी व मूत्रविकाराशी संबंधित इतर समस्या भेडसावू लागतात. याबाबत ज्येष्ठ नागरिकांत जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 24) दुपारी चार वाजता सुरभि हॉस्पिटल, नगर- औरंगाबाद रोड येथे प्रसिद्ध युरोसर्जन डॉ. अमित देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

पेन्शनर्स असोसिएशनच्या सहकार्यातून हा कार्यक्रम होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. देशपांडे म्हणाले की, उतरत्या वयानुसार लघवीला जळजळ, थेंब थेंब लघवी होणे, लघवी वरचं नियंत्रण सुटणे, लघवीला सारखे जावे लागणे आदी मूत्र विकाराशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

याबाबत वेळीच दक्षता घेतली नाही तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. मूत्रविकासंबंधी जनजागृतीच्या हेतूने महापालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरभि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button