SBI Scheme : एसबीआयची आत्तापर्यंतची सर्वात खास योजना सुरु, फक्त आधार कार्डची असेल गरज…
स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन सुविधा सुरु केली आहे. यामार्फत विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे.

SBI Scheme : जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन सुविधा सुरु केली आहे, जायचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शुक्रवारी ग्राहकांसाठी आधारद्वारे सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी करण्याची सुविधा सुरू केली. नवीन सुविधेचा परिचय करून देताना, SBI चे चेअरमन दिनेश खारा म्हणाले की, विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे. ही सुविधा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांवर (CSP) उपलब्ध असेल.
बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांमध्ये नोंदणीसाठी ग्राहकांना फक्त ग्राहक सेवा केंद्रांवर आधार कार्ड बाळगणे आवश्यक आहे.
पासबुक घेऊन जाण्याचा त्रास संपला आहे
यानुसार, या कामांसाठी ग्राहकांना यापुढे CSP मध्ये पासबुक बाळगण्याची गरज भासणार नाही. खारा म्हणाले की, नवीन सुविधेचा उद्देश आर्थिक सुरक्षितता मिळविण्यातील अडथळे दूर करून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवणे आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे.
सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये मिळणारे फायदे जाणून घ्या
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक वर्षाची जीवन विमा योजना आहे जी कोणत्याही कारणामुळे मृत्यूपासून संरक्षण देत असते. 2 लाख रुपयांचे आयुर्विमा संरक्षण केवळ 436 रुपये प्रतिवर्ष प्रीमियमवर उपलब्ध आहे.
त्याच वेळी, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक वर्षाची अपघात विमा योजना आहे जी अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण प्रदान करते. अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत, लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षांनंतर किमान एक हजार ते पाच हजार मासिक पेन्शन मिळते.
दरम्यान, बाजार भांडवलाच्या बाबतीत SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. याशिवाय मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी इत्यादी बाबतीत एसबीआय इतर सर्व बँकांपेक्षा पुढे आहे.
जून 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, एसबीआयकडे एकूण 45.31 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक ठेवी आहेत, तर एसबीआयने 33 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वितरित केले आहे.