दुर्दवी घटना ! जिल्ह्यातील ‘या’ धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

नगर येथील मांडओहोळ धरणामध्ये पोहत असताना १६ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहसीन मुकीनमुद्दीन काझी (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे गुरुवार, दि. ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराम नगरहून कुटुंबातील २० जण फिरण्यासाठी आले होते.
धरणातील पाण्यात पोहण्यासाठी अनेक जण उतरले होते. मात्र, यातील मृत तरुण मोहसीन मुकीनमुद्दीन काझी (वय १६) याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर स्थानिक लोकांनी बचावाचा प्रयत्न केला. मोहसीनला पाण्याबाहेर काढून टाकळी ढोकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुदैवावाने या घटनेत मोहसीनचे दोन साथीदार बचावले. याबाबत म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे व पोलिस कॉन्स्टेबल गवळी यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मोहसीनला पाण्याबाहेर काढले.
दरम्यान टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहे.