अहमदनगरताज्या बातम्या

‘जलयुक्तसाठी जिल्ह्यातील २४० गावांची निवड!; तालुकानिहाय गावांची यादी वाचा

जलसंधारणासोबतच मृदूसंधारणाचे काम करीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई पासून गाव-शिवार मुक्‍त व्हावा. या उद्देशाने प्रेरित असलेल्या जलयुक्‍त टप्पा दोन या अभियानात जिल्ह्यातील २४० गावांची निवड करण्यात आली आहे.

जलयुक्‍त जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यावर मान्यतेची मोहर उमटवली आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांच्या सोबत जलयुक्तची बैठक घेतली.

त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी नगर जिल्ह्यातील वनकुटे येथे आले होते.

Advertisement

या दोऱ्यानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जलयुक्‍त टप्पा दोनसाठी निश्चित करण्यात आलेली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली.

यावेळी जलयुक्‍त जिल्हास्तरीय समितीचे सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, पारनेर प्रांताधिकारी सुधाकर भोसले,

जलसंधारण अधिकारी सतीश गाडेकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी. अधिकारी दिलीप सोनकुसळे, जलसंपदा. अधिकारी बी.जी.खैरे,

Advertisement

कार्यकारी अभियंता के.बी. बनकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पी.एम.शिंदे, मृदू व जलसंधारण. अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

तालुकानिहाय गावे :

कोपरगाव : बोलका, ब्राह्मणगाव धरणगाव चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, करंजी बुद्रुक, खिर्डी गणेश, कोकमठाण, माळेगाव थडी, मुर्शतपूर, सडे, रवंदे, शिंगणापूर, सोनारी, टाकळी, येसगाव, नाटेगाव, संवत्सर, सांगवी भुसार, माहेगाव देशमुख, सुरेगाव, चासनळी, कोळपेवाडी.

Advertisement

जामखेड : कुसडगाव, कवडगाव, अरणगाव, पाटोदा, धानोरा, फकराबाद, पिंपरखेड, खुरदैठण, माळेवाडी, हळगाव रत्नापूर जवळा लोणी मुंगेवाडी गुरेवाडी खांडवी डिसलेवाडी, बाघा, सारोळा, काटेवाडी, मोहा,सावरगाव.

राहाता : पाथरे बुद्रुक,लोणी बुद्रुक, हसनापूर, दाढ बुद्रुक, हनुमंतगाव, दुर्गापूर, लोहगाव, भगवतीपुर, रांजणगाव खुर्द, सावळी विहीर बुद्रुक, सावळी विहीर खुर्द शिंगवे, ममदापूर, नांदूर बुद्रुक, नांदुरखी खुर्द, नांदुरखी बुद्रुक, रांजणखोल, साकुरी, अस्तगाव, डोऱ्हाळे, तिसगाव.

संगमनेर : कर्जुले पठार, पानोडी, सायखिंडी, नांदुरी दुमाला, पिंपळगाव देपा, आकालपूर, चिंचोली गुरव, दरेवाडी, डोळासणे, कवठे कमलेश्‍्वर, खांबे, खरशिंदे, कुंभारवाडी, निमोण, पळसखेडे, सावरगाव घुले, वरवंडी, कणसेवाडी, पिंपळगाव कोंझिरा, रायतेवाडी, वडगावपान.

Advertisement

कर्जत: खंडाळा, सुपे, चापडगाव, बिटकेवाडी, भोसे, मांदळी, मुळेवाडी, मिरजगाव, होलेवाडी, परीटवाडी, तोरकडवाडी, आखोणी, वायसेवाडी, माळेवाडी, सुपेकरवाडी, हिंगणगाव, गोंधर्डी, आहेत कोंभळी, थेरगाव, कोडाने.

अकोले: चास, देवठाण, धामणगाव आवारी, डोंगरगाव, डोंगरवाडी, गणोरे, गारवाडी, कळंब, केळी ओतूर, खानापूर, माणिक ओझर, मन्याळे, मुथाळणे, पिंपळगाव निपाणी, पिसेवाडी, रेडे, तांभोळ, विरगाव, शेरणखेल, पिंपळगाव नाकविंदा. : ब्राह्मणी, चांदकापुर, चेडगाव, चिंचोली, धानोरे, गंगापूर, केंदळ बुद्रुक, केंदळ खुर्द, कोल्हार खुर्द, कोंढबड, माळेवाडी, पिंपळगाव फुनगी, पिंपरी वळण, रामपूर, संक्रापूर, सात्रळ, शिलेगाव, सोनगाव, उंबरे.

पारनेर: घानेगाव, बाभुळवाडा, काताळवेढा, पळसपुर, पिंपळगाव रोठा, विरोली, टाकळी ढोकेश्वर, वडनेर हवेली, पळवे बुद्रुक आणि खुर्द, सावरगाव, सिद्धेश्वरवाडी, कानूर पठार, भोंद्रे, वेसदरे, पुनेवाडी, पिंप्री पठार. पाथर्डी : हनुमान टाकळी, जवखेडेदुमाला, मढी, येळी, मोहटे, भिलवडे, जबखेडे खालसा, जिरेबाडी, करंजी, दगडवाडी, घाटशिरस, सातवड, करोडी, मोहोज देवढे, खरवंडी कासार.

Advertisement

नगर: पिंपरी घुमट, आव्हाडवाडी, खोसपुरी, मजले चिंचोली, पांगरमल, उदरमल, ससेवाडी, इमामपुर, बालेवाडी, सांडवे, बहिरवाडी, मदडगाव, भोवरे पठार, दशमी गव्हाण.

श्रीगोंदा : बेलवंडी बुद्रुक, बोरी, चिंबळे, घारगाव, हंगेवाडी, पिसोरे बुद्रुक, प गोलीसवाडी,वेठेकरवाडी, येळपणे, बेलवंडी कोठार, घुगलवडगाव, खेतमाळसवाडी,पारगाव, वडाळी.

नेवासा : फत्तेपूर, लोहरबाडी, झापवाडी, चांदा, घोडेगाव, सोनई, करजगाव, खुर्द, पिचडगाव, राजेगाव, चिंचबन, पट .

Advertisement

श्रीरामपूर : दत्तनगर, एकलहरे, फत्याबाद, गळनिंब, कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, खंडाळा, कुरणपूर, मांडवे, मातुलठाण, नायगाव, उक्कलगव. शेवगाव: वाघोली, अघोडी , दिवटे, जोहरापूर, लाडजळगाव, नागलवाडी, वरुर खुर्द, मळेगाव, निंबे, लोळेगाव.

 

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button