स्वयंघोषित राजकारण्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी शेतकरी व व्यापारी अडचणीत येईल असे काम करू नये !
काही स्वयंघोषित राजकारण्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी शेतकरी व व्यापारी अडचणीत येईल असे काम करू नये, त्यांची अवस्था पावसाळ्यातील भूछत्र्यासारखी आहे, निवडणुका आल्या की,

शेतकरी, व्यापारी हे बाजार समितीतील महत्वाचे घटक आहे, आणि बाजार समिती त्यातील एक दुवा आहे, त्या माध्यमातून नगर बाजार समिती राज्यात अग्रेसर आहे. यातून नगर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होत असून शहर विकासाला चालना मिळते,
काही स्वयंघोषित राजकारण्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी शेतकरी व व्यापारी अडचणीत येईल असे काम करू नये, त्यांची अवस्था पावसाळ्यातील भूछत्र्यासारखी आहे, निवडणुका आल्या की,
जागे होवून समाजात अपप्रचार पसरवण्याचे काम करतात, आता राजकारणात विश्वासार्हता नसलेल्यांची संख्या खूप मोठी आहे, यासाठी तणनाशक फवारण्याची गरज आहे, आम्ही पाचही वर्ष सर्व घटकासाठी काम करत आहोत,
तरी शेतकरी, व्यापारी यांनी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे, शेतकऱ्यांना कांदा व्यापारासाठी नेप्ती उपबाजारसारखी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
मार्केट यार्ड येथे रात्री भरणारा भाजी बाजार राज्यात नक्कीच नावलौकिक मिळवून देईल, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळेल, बाजार समितीने घेतलेला शेतकरी हिताचा निर्णय कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ संग्राम जगताप यांनी केले.
नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दररोज सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालू राहणाऱ्या भाजीपाला, फळे व फुले या बाजाराचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सचिन कोतकर, नगरसेवक निखील वारे, संचालक संतोष म्हस्के, सुधीर भापकर, दत्ता तापकिरे, मधुकर मगर, सुभाष निमसे, राजू आंबेकर,
राजेंद्र बोथरा संजय हिरावले, आबासाहेब सोनवणे, रामदास सोनवणे, भाऊ भोर, धर्मनाथ आव्हाड, विलास शिंदे, भाऊसाहेब ठोंबे, मंजाबापू घोरपडे, दीपक सातपुते, अनिल करांडे,
दादा दरेकर, अशोक लाटे, नंदकुमार शिक्रे, नंदकुमार बोरुडे, गोविंद सांगळे, गोविंद वाघ, रमेश इनामकर, संभाजी पवार, बाळासाहेब मेटे, सचिव अभय भिसे, सचिन सातपुते, संजय काळे, शेतकरी दिगंबर निमसे, संतोष आमले, शरद गुंड, अजित साळवी आदी उपस्थित होते.
यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले कि, नगर तालुक्यातील योतकन्यांची चौथ्यांदा बाजार समितीची सत्ता ताब्यात देवून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावरचा विश्वास दाखवून दिला आहे, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला महानगरात जलद गतीने जाण्यासाठी संध्याकाळचा भाजीबाजार सुरु केला आहे,
त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळेल, नेप्ती उपबाजार कांदा मार्केट अपुरे पडत असून लवकरच शेजारी वाढीव मार्केट केले जाणार आहे,
याचबरोबर मार्केट यार्ड मधील खराब रस्त्यांच्या डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे तसेच चिचोंडी पाटील येथे लवकरच उपबाजार समिती सुरु केली जाणार आहे, त्यामुळे बीड, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीमाल येण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
सभापती भाऊसाहेब बोठे म्हणाले की, भाजीपाला, फळे, फुले असोसिएशन यांच्या मागणीनुसार संध्याकाळचा भाजी बाजार सुरु झाला असून शेतकऱ्यांना आपला ताजा भाजीपाला बाजारात आणण्यासाठी मदत होईल,
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मुंबई,
कल्याण, छत्रपती संभाजीनगर, पुणे व इतरही ठिकाणच्या बाजारपेठा जलद गतीने उपलब्ध होवून शेतीमाल पाठवणे शक्य होईल व बाजारभाव चांगला मिळेल,
शेतकरी दिवसभर आपल्या शेतमालाची काढणी करतात पण ताजा माल पहाटे आणणे अनेकदा जिकरीचे होत असून तोपर्यंत सुकला जातो त्यामुळे शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळत नाही, पण आता सायंकाळी भाजीपाला, फळे व फुले मार्केट सुरु झाल्यास शेतकऱ्यांना आपला ताजा शेतमाल सायंकाळी विक्री करुन तो बाजारपेठेत पाठविणे आणि व्यापारी यांना खरेदी करीता उपलब्ध राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले