अहमदनगर

खळबळजनक: राजकारणावरून कुरघोडी; थेट सरपंच पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर- राजकारणावरून व रिसॉर्टचे कर भरण्याचे कारणावरून नगर तालुक्यातील देवगाव येथील देवदरी रिसोर्टच्या मालकाने गावच्या सरपंच पतीला जीवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

विठ्ठल तुकाराम वामन असे देवदरी रिसोर्टच्या मालकाचे नाव आहे. सरपंच पती संभाजी शिवाजी वामन (वय 40) यांना त्याने जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक केली आहे. अविनाश बाळासाहेब ठोंबरे (रा. सिद्धार्थनगर) याला अटक केली आहे.

 

दरम्यान 17 ऑगस्ट रोजी तिघांनी संभाजी वामन यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या तपासात हा प्रकार अविनाश ठोंबरे, वीर दीपक सोनवणे (रा. सर्जेपुरा) राहुल उर्फ बंडू उक्कम घोरपडे, बच्चू काते (दोघे रा. सिद्धार्थनगर) यांनी केल्याचे समोर आले.

 

त्यांना विठ्ठल तुकाराम वामन 50 हजार रूपयांची सुपारी मिळाली होती. मारण्यासाठी वेळोवेळी बैठका झाल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button