September 2023 : फक्त 3 दिवस उरले ! ‘ही’ 5 महत्वाची कामे आजच पूर्ण करा नाहीतर कराल पच्छाताप; जाणून घ्या
सप्टेंबर महिना संपत आला असून अवघे चार दिवस उरले आहेत. यासोबतच अनेक आर्थिक कामे आहेत जी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

September 2023 : सध्या सप्टेंबर महिना आहे. या महिन्यातील अवघे 3 दिवस उरले आहेत. या महिन्याच्या समाप्तीला अनेक कामाची शेवटची तारीख आहे, त्यामुळे तुम्ही ही कामे या 2 ते 3 दिवसात पूर्ण करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही ही कामे या मुदतीत पूर्ण करू शकत नसाल तर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये महत्वाचे म्हणजे चलनातून बाहेर काढलेल्या रु. 2,000 च्या नोटा परत करण्यासाठी आणि SBI We Care FD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत.
2000 च्या नोटा काढण्याची अंतिम मुदत
तुमच्याकडे अजूनही 2,000 रुपयांच्या गुलाबी नोटा आहेत ज्या चलनातून बाहेर काढल्या गेल्या आहेत, तर तुमच्याकडे त्या बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. म्हणजेच चार दिवसांत या नोटा बदलल्या नाहीत तर त्या रद्दीत जमा होतील.
कारण या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती, जी आता जवळ आली आहे. तथापि, बाजारात उपस्थित असलेल्या एकूण नोटांपैकी 93 टक्के नोटा 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आरबीआयकडे परत आल्या होत्या.
लहान बचत योजनांसाठी आधार अपडेट
पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही सप्टेंबर महिना खास आहे. वास्तविक, जर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) सह या सरकारी योजनांमध्येही गुंतवणूक करत असाल तर, 30 सप्टेंबरपर्यंत आधार क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही हे काम निर्धारित मुदतीपर्यंत करू शकत नसाल, तर तुमच्या गुंतवणुकीवर बंदी घातली जाऊ शकते किंवा तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. यासंदर्भातील अधिसूचना अर्थ मंत्रालयाने आधीच जारी केली आहे.
बँक लॉकरसाठी करारावर स्वाक्षरी
एसबीआय, बँक ऑफ बडोदासह इतर बँकांमध्ये लॉकर घेणार्या ग्राहकांसाठीही अलर्ट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक लॉकर घेणार्या ग्राहकांनी नवीन करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
जर तुमचे देखील या बँकांमध्ये लॉकर असेल तर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला बँक लॉकर सोडावे लागू शकते. अनेक बँकांनी लॉकर घेणाऱ्या ग्राहकांना एसएमएसद्वारे अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे.
हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत. याअंतर्गत बँक लॉकर करारावर 30 जून 2023 पर्यंत 50 टक्के, 30 सप्टेंबरपर्यंत 75 टक्के आणि 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के ग्राहकांच्या सह्या घेणे आवश्यक करण्यात आले आहे.
SBI WieCare योजनेत गुंतवणूक करा
तसेच या महत्त्वाच्या कामांव्यतिरिक्त, मुदत ठेवींमध्ये म्हणजेच FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी SBI WeCare स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे. स्टेट बँकेची ही विशेष एफडी योजना आहे, वृद्ध लोकांना सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा 1% अधिक व्याज दिले जाते.
सध्या, SBI च्या WeCare योजनेवर 7.50 टक्के पर्यंत व्याज उपलब्ध आहे. SBI च्या नियमित FD वरील व्याज दर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.50 टक्के ते 7.50 टक्के दरम्यान आहेत. SBI ची ही FD योजना 30 सप्टेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला घाई करण्याची गरज आहे.
LIC धन वृद्धी योजना बंद केली जाईल
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाची एक उत्तम पॉलिसी 30 सप्टेंबर 2023 रोजी बंद होत आहे. या पॉलिसीचे नाव LIC धन वृद्धी आहे. ही एकल प्रीमियम पॉलिसी आहे, जी पॉलिसीधारकांना हमी परतावा देते.
या योजनेत तुम्ही संरक्षण आणि बचत करू शकता, म्हणजेच तुम्हाला केवळ विमा मिळत नाही, तर तुमचे पैसेही वाढतात. तुम्हाला या पॉलिसीमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला या योजनेचे लाभ आयुष्यभर मिळतील. अशा प्रकारे तुम्ही या सर्व गोष्टी कामजीपुर्वक जाणून घेऊन त्यानुसार लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावी.